आपल्या प्रत्येकालाच आपली त्वचा सुंदर आणि आरोग्यदायी असावी असं वाटते आणि विशेषतः मुलींना तर आपली त्वचा सुंदर दिसावी असं नेहमीच वाटत असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, आपण आपल्याच चुकीच्या पद्धतीने आपल्या त्वचेची काळजी घेऊन आपल्याच त्वचेची सुंदरता आणि आरोग्य दोन्ही कमी करत असतो.
त्यासाठीच आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक दृष्टिकोनातून त्वचेची काळजी कशी घ्यावी? हे या Article च्या माध्यमातून सांगणार आहोत. आयुर्वेदिक पद्धतीने आपण आपल्या त्वचेची काळजी कशी घेऊ शकतो? तरी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो की, कृपया प्रस्तुत Article सुरवातीपासून ते अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा. हे वाचून नक्कीच तुम्हाला तुमच्या त्वचेची योग्य पद्धतीने आणि आयुर्वेदिक पद्धतीने काळजी घेता येईल.
अनादी काळापासूनचा आयुर्वेदाचा वारसा लाभलेला आपला हा भारत देश आहे. आयुर्वेदामुळे कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम न करता दिर्घकाळापर्यंत तुमच्या त्वचेवरील सुंदरता आणि आरोग्य टिकून राहू शकते. यासाठी आम्ही तुम्हाला आयुर्वेदात सांगितलेले काही उपाय सांगत आहोत ते नीट काळजीपूर्वक वाचा आणि त्याचा आपल्या त्वचेची आयुर्वेदीय दृष्टिकोनातून काळजी घ्या.
1. प्राचीन आयुर्वेदात सांगितलेला एक गुपित लेप
आपल्या प्राचीन आयुर्वेदात एक रहस्यमय आणि गुपित लेप किंवा त्यालाच उटणे सांगितलेले आहे. हे लेप बनविण्यासाठी तुम्हाला यातील आवश्यक असलेले घटक शोधण्यासाठी कुठंही जायची आवश्यकता भासणार नाही कारण यामध्ये वापरलेले सर्व घटक तुमच्याच स्वयंपाक घरात आढळतात.
लेप बनविण्यासाठी लागणारे आवश्यक घटक बेसन 2 चमचे, चंदनाचा पावडर, ½ चम्मच हळदी पावडर, थोडासा चिमुटभर कापूर आणि यासोबत तुमच्याकडे गुलाबजल किंवा दूध किंवा हे दोन्ही नसतील तर साधे पाणी देखील चालते. हे सर्व घटक प्रस्तुत लेप बनविण्यासाठी लागतात.
वरील सर्व घटकांना एकत्रित करून त्यांचे थोडे हलके घट्ट मिश्रण बनवा आणि चेहऱ्यावर 20 मिनिटे लावून ठेवा आणि सोबतच दोन कापसाच्या पट्ट्या तयार करून त्यांना गुलाब जल मध्ये भिजवून डोळ्यांवर ठेवा आणि सोबतच 20 मिनिटे सुंदर तुमच्या आवडीचं गाणं लावा.
असे केल्यास तुमच्या त्वचेवर तेज येईल आणि तुमचं मन देखील शांत होईल.
2. व्यायाम करा
सकाळी उठून धावायला जा, जॉगिंग करा, सूर्यनमस्कार घाला आणि वेग वेगळे व्यायाम करा ज्यामुळे तुमच्या शरीरामधून घाम निघेल. घाम निघणे त्वचेसाठी खूप लाभदायक असते. परंतु घाम आल्यानंतर त्याला कापडाने पुसून न टाकता चेहरा स्वच्छ पाण्याने आधी धुवा आणि नंतरच मऊ कापडाने पुसा.
3. आपल्या त्वचेचे प्रकार ओळखा
तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे माहिती असणे फार गरजेचे आहे कारण त्याशिवाय तुम्हाला कोणते आहार घ्यायचे आहेत हे ओळखता येणार नाही. आयुर्वेदानुसार माणसाच्या त्वचा 3 प्रकारच्या असतात. पित्त, कफ आणि वात.
वात या त्वचा प्रकारामध्ये त्वचा कोरडी असते, पित्त या प्रकारामध्ये त्वचा सामान्य असते आणि कफ या प्रकारामध्ये त्वचा ही तेलकट गुणधर्माची असते.
4.खानपान
आपले शरीर आपण जे खातो त्यानेच बनलेले असते त्यामुळे आपली त्वचा देखील त्याच पद्धतीने असते. ताज्या फळभाज्या, स्वच्छ व अन्न आपण सेवन केले तर नक्कीच आपल्या त्वचेवर सुद्धा तेज येईल.
5. आठवड्यातून एकदा मसाज करावी
आठवड्यातून एकदा तरी आपल्या त्वचेची मसाज करावी. त्याकरिता तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तेल निवडावे नारायण किंवा दुसरे कोणतेही प्रकारचे तेल निवडा किंवा बदाम, मोहरा, नारळ या तेलांचा सुद्धा वापर करता येतो कारण या तेलांमुळे शरीरास आवश्यक ते पोषक तत्वे मिळत असतात.
6. नियमित ध्यान करणे आवश्यक आहे
त्वचेच्या सुंदरतेसाठी आणि आरोग्यासाठी नियमितपणे ध्यान करने फार गरजेचे असते. यामुळे आपले अंतर्मन शुद्ध होते आणि त्याचा थेट प्रभाव आपल्या त्वचेवर पडत असते. त्यामुळे रोज ध्यान करने आवश्यक आहे.
7. हसत रहा आनंदी रहा
आपली त्वचा सुंदर आणि आरोग्यदायी बनवायची असेल तर दु:खी राहणे किंवा खूप चिंता करणे टाळावे कारण याचा थेट प्रभाव आपल्या त्वचेवर होत असतो आणि त्यामुळे नेहमी हसत राहावे आनंदित राहावे.
8. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून त्वचेची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे का?
होय! कारण कुठलीही गोष्ट जी आरोग्याशी संबधित आहे त्या त्या वेळी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्या करीता आम्ही तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही आमच्या Aatreya Ayurved & Panchakarma Clinic, Pune या क्लिनिक मध्ये नक्कीच भेट द्या. आमच्या या हॉस्पिटल मध्ये रोगांच्या मुळात जाऊन अस्सल आयुर्वेदिक उपचार केले जातात तसेच गर्भसंस्कार सत्र नावाचे एक विशेष कार्यक्रम केले जाते.
Address – Hrishikesh Apartments, Shop no. C-20, Malwadi Rd, Hadapsar, Pune,
Conclusion
तर मित्रांनो आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक दृष्टिकोनातून त्वचेची काळजी कशी घ्यावी? या Article च्या माध्यमातून आयुर्वेदीक पद्धतीने त्वचेची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. आमचे हे Article तुम्हाला आवडले असेल तर शेअर करायला विसरू नका.
अधिक माहिती साठी हा Video नक्की पहा