वाताचे आजार आणि आयुर्वेदिक उपचार

वाताचे आजार आणि आयुर्वेदिक उपचार

आयुर्वेदानुसार शरीराचे संतुलन तीन दोषांवर आधारित असते – वात, पित्त आणि कफ. यातील वात दोष हा शरीरातील सर्व हालचालींना कारणीभूत ठरतो – श्वास घेणे, रक्ताभिसरण, स्नायूंची हालचाल, मल-मूत्र विसर्जन, मज्जासंस्थेचे कार्य आणि मनाची गतीसुद्धा. वाताचे असंतुलन हे शरीराच्या विविध कार्यांमध्ये अडथळा निर्माण करतं आणि अनेक तीव्र व दीर्घकालीन आजारांना कारणीभूत ठरू शकतं.

वात दोषाचे गुणधर्म (Properties of Vata Dosha)

चरक संहितेतील वर्णन – “रूक्षः लघुः शीतः खरः सूक्ष्मः चलः“

वात दोषाचे गुणधर्म:

  • रूक्ष (Dry) – कोरडेपणा, कोरडी त्वचा, कोरडे केस
  • लघु (Light) – सौम्य किंवा हलकी भावना
  • शीत (Cold) – थंडीची संवेदना, थंडीने त्रास
  • खर (Rough) – सांधेदुखी, त्वचेतील खरखर
  • सूक्ष्म (Subtle) – नसा, मज्जातंतूंत झपाट्याने प्रवेश
  • चल (Mobile) – अस्थिरता, कंप, थरथर

या गुणांचा अतिरेक झाल्यास, वाताचे आजार उत्पन्न होतात.

वात वाढण्याची कारणं (Causes of Vata Imbalance)

  1. अनियमित व हलकासा आहार
  2. वारंवार उपवास / दीर्घकाळ उपाशी राहणे
  3. अति प्रवास, थंडीचा अति संपर्क
  4. चिंता, नैराश्य, अतिताण
  5. रात्र जागरण / अपूरी झोप
  6. पचनशक्ती मंद होणे (मंद अग्नी)

वातदोषामुळे होणारे आजार (Common Vata-Related Disorders)

आयुर्वेदिक नाव आजाराचे आधुनिक समांतर
संधिवात (Sandhivata) संधिवात, ऑस्टिओआर्थरायटिस
गृध्रसी (Gridhrasi) सायटिका
अवबाहुक (Avabahuka) Frozen Shoulder
कटिग्रह / कटिशूल Lower back pain
अर्धांगवायू (Pakshaghat) Paralysis
स्नायुगत वात  (Vatavyadhi) Muscle cramps, Nerve pain
वायुगोळा / आध्मान Bloating, IBS
अनिद्रा / अस्थिर चित्त Insomnia, Anxiety

आयुर्वेदिक उपचार पद्धती (Ayurvedic Line of Treatment)

1. स्नेहन (Oleation – Internal & External)

वातामुळे निर्माण झालेला कोरडेपणा आणि stiffness स्नेहनामुळे कमी होतो.

  • बाह्य स्नेहन: बृंहण तैल, महानारायण तैल, दशमूल तैल यांचा अभ्यंग
  • आंतरिक स्नेहन: सिद्द्ध तीळ तैल

2. स्वेदन (Sudation / Steam Therapy)

स्निग्धता मिळाल्यानंतर स्वेदन म्हणजे उष्णता देऊन वातास सहज बाहेर काढणे.

  • नाडी स्वेदन
  • बाष्प स्वेदन
    उपयुक्तता-  Frozen shoulder, संधिवात, मुरगळ

3. बस्ती (Medicated Enema – Prime Treatment for Vata)

चरक संहितेनुसार – “Basti is the half treatment for Vata vyadhi”

  • अनुवासन बस्ती – स्निग्ध बस्ती, रोज तिळतैलयुक्त
  • निरुह बस्ती – काढा व औषधी मिश्रण घालून
  • लेखन बस्ती – जडपणा, सूज, व वजन कमी करण्यासाठी
  • उत्तर बस्ती – स्त्री रोग, मूत्ररोगात

4. शमन औषधी (Herbal Medicines)

  • योगराज गुग्गुळ, महा योगराज गुग्गुळ
  • दशमूल क्वाथ
  • अश्वगंधा चूर्ण
  • वातविध्वंसक रस, एरंड तेल
  • शतावरी, शल्लकी, इत्यादी

नोट: औषधी चिकित्सकांच्या सल्ल्याने घ्याव्यात.

वातशामक आहार – काय खावं?

आहार:

  • गरम, स्निग्ध, सुपाच्य अन्न
  • साजूक तूप, मूगडाळ, भात, सूप
  • आले, हळद, हिंग, सुंठ
  • ताजं शिजवलेलं अन्न, वेळेवर आहार

टाळावं:

  • थंड पदार्थ, आइस्क्रीम
  • कोरडं अन्न – पापड, फरसाण
  • फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ
  • उपवास, आहारातील अनियमितता

जीवनशैली सुधारणा (Lifestyle Advice)

  • नित्य अभ्यंग – रोज तेल लावणे
  • योगासने व प्राणायाम – विशेषतः वज्रासन,  पवनमुक्तासन, इ.
  • ध्यान / प्रार्थना / सुसंवाद – मनशांतीसाठी
  • नियमित झोप –रात्री जागरण टाळणे

वात दोष वाढल्यास शरीरात दुखणी, कोरडेपणा, अनियमित हालचाल, मानसिक अस्थैर्य अशा त्रासांना सामोरे जावं लागतं. पण आयुर्वेदिक पद्धतीने योग्य वेळी पंचकर्म, स्नेहन-बस्ती, आणि जीवनशैलीत योग्य बदल केल्यास वात विकारांवर नैसर्गिक, शाश्वत व दुष्परिणामरहित उपचार शक्य आहेत.

वातशामक पंचकर्म आणि सल्ल्यासाठी संपर्क करा:

आत्रेय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक हडपसर, पुणे
मोबाईल नंबर : +91 9860007992