कोरोनावरील उपचार पद्धतीत भारतीय आयुर्वेद काढा वापरण्याचा निर्णय जपानने घेतला आहे.
जगाभरात कोरोनाचा (Cornavirus) धोका वाढला आहे. कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लस’ बाजारात आली. मात्र, असे असताना सुद्धा कोरोनाला रोखण्यात यश आलेले नाही. जगात आता कोरोनाची तिसरी लाट येवू घातल्याचे संकेत मिळत आहे. तिसरा नवा कोरोनाचा स्ट्रेन सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. तर डबल म्यूटेंटने पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे कोरोनाची बाधितांचा आकडा वाढत आहे. आता तर जपानने कोरोनावर (Cornavirus in Japan) मात करण्यासाठी भारतीय काढ्याचा (Indian Ayurvedic extract) वापर करणार आहे. कोरोनावरील उपचार पद्धतीत भारतीय आयुर्वेद काढा वापरण्याचा निर्णय जपानमधील इजुमियोत्स या शहराच्या महापौरांनी घेतला आहे. यासाठी पुण्यातील वैद्याचा त्यात सहभाग असणार आहे. (Japan preferred Indian Ayurvedic extract as a treatment for corona)
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, जपानने आयुर्वेदाला महत्व दिले आहे. जपानने कोरोनावरील उपचार पद्धतीला प्राधान्य देताना पुण्यातील डॉ. सुकुमार सरदेशमुख यांच्या संशोधनाचा आधार घेतलाआहे. कोरोनावर कोणतेही औषध नसल्यामुळे जगभरातील विविध पर्यायांची चाचपणी करण्यात येत आहे जपानने कोरोनावर मात करण्यासाठी नैसर्गिक उपाचार पद्धतीला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी नैसर्गिक, रसायनांशिवाय उपचारांना पसंती दिली आहे. त्यासाठीच भारतीय काढ्याचा समावेश करण्यात आला आहे.
महापौर केनिची मिनामिडे यांनी कोरोनावरील उपारावर अभ्यास करण्यासाठी आणि संशोधनासाठी मदत व्हावी म्हणून अलिकडे ऑनलाई चर्चासत्र घेतले. या चर्चासत्रात पुण्यातील वैद्य सुकुमार सरदेशमुख यांनी सहभाग घेतला होता. त्यांना तसे निमंत्रण देण्यात आले होते. वैद्य सुकुमार सरदेशमुख यांनी संशोधनाद्वारे तयार केलेल्या आयुर्वेदिक काढ्याचा चांगला उपोग होत असल्याचे नमूद केले. त्यांनी कोविड आणि कोविडोत्तर काळात या काढ्याचा आम्ही वापर करणार आहोत, असे सांगितले. यावेळी जपान सरकारचे डॉ. मोटोको सातो आणि डॉ. माकिकी सातो या चर्चासत्रात सहभागी झाले होते.
यावेळी वैद्य सुकुमार सरदेशमुख यांनी सांगितले की, आम्ही तयार केलेला काढा चांगला आहे. आमच्या कंपनीने तयार केलेला काढा कोणीतही त्यांना पाठवला. तो गुणकारी सिद्ध होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मला चर्चासत्रासह सहभागी करुन घेतले. यामुळे आम्हाला याचा जास्त अभिमान आहे. तुळस, अश्वगंधा, सुंठ, दालचिनी, लवंग, गुळवे, ज्येष्ठमध या औषधी वनस्पतींचा त्यात वापर करण्यात आला आहे. एकात्मिक उपचार पद्धीत हा काढा वापरला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
Credit Link – https://zeenews.india.com/marathi/world/japan-preferred-indian-ayurvedic-extract-as-a-treatment-for-corona/562731