कॉन्स्टिपेशन /बद्धकोष्ठता म्हणजे नक्की काय, बद्धकोष्ठता होण्याची कारणे कोणती आणि त्यावर कोणते उपाय करणे आवश्यक आहे याबाबतची माहिती आपण आज पाहणार आहोत.
Constipation म्हणजे काय? पोट साफ न होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय
Constipation म्हणजे काय?
- कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होणे किंवा मलावर जाण्याची प्रक्रियासंदर्भातील समस्या.
- कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता म्हणजे शौचास त्रास होणे तसेच नियमितपणे दररोज शौच न होणे, शौचामध्ये अडचणी येणे होय.
- सामान्यतः जर एखाद्या व्यक्तीला आठवड्यात तीन किंवा त्यापेक्षा कमी वेळा मलावर जावे लागले, तर त्याला कॉन्स्टिपेशन म्हणून मानले जाऊ शकते.
- बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या असली तरीसुद्धा त्याने आरामदायक जीवनावर परिणाम होऊ शकतो.
- बद्धकोष्ठता ही समस्या तात्पुरती किंवा कायमची असू शकते परंतु वेळीच उपाय केल्यास ही समस्या नष्ट होऊ शकते.
पोट साफ न होण्याची कारणे :
काँस्टिपेशनची अनेक कारणे असू शकतात:
आहारातील कमी फायबर:
- आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये फायबर न घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या जाणवू शकते.
- म्हणूनच आहारामध्ये फायबरयुक्त धान्य, फळे तसेच भाज्या यांचे सेवन करणे आवश्यक आहे.
- फायबर युक्त आहार घेतल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या जाणवणार नाही परंतु त्यासोबतच पोटाच्या इतर समस्या सुद्धा जाणवणार नाहीत.
पाण्याचा कमी वापर:
- काही व्यक्ती दररोज योग्य प्रमाणामध्ये पाणी पीत नाही त्यामुळे शरीराच्या इतर समस्या जाणवतात त्यासोबतच बद्धकोष्ठता ही समस्या सुद्धा जाणवू शकते.
- कमी पाणी पिल्यामुळे पोट व्यवस्थित रित्या साफ होत नाही आणि बद्धकोष्ठतेची समस्या जाणवते.
व्यायामाची कमतरता:
- शरीरासाठी दररोज व्यायाम करणे खूप गरजेचे आहे परंतु शरीराची हालचाल कमी प्रमाणामध्ये असल्याने किंवा व्यायामाची कमतरता असल्यामुळे पोट साफ होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या जाणवू शकते.
मानसिक ताण:
- मानसिक ताण, चिंता किंवा नैराश्यामुळे पचनक्रिया प्रभावित होऊ शकते आणि त्यामुळे सुद्धा बद्धकोष्ठतेची समस्या जाणव शकते.
औषधे:
- काही औषधे किंवा सप्लिमेंट्स मुळे सुद्धा कॉन्स्टिपेशनची समस्या जाणवू शकते.
आरोग्याच्या समस्या:
- थायरॉइड, डायबेटीस, किंवा इतर काही आरोग्याच्या समस्या असल्यास पोट साफ होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.
दुग्धजन्य पदार्थांचे अतिरिक्त सेवन :
- दुग्धजन्य पदार्थांचे अतिरिक्त सेवन केल्यामुळे सुद्धा पोटाच्या समस्या जाणवू शकतात.
शौचाला जाण्याची गरज दुर्लक्षित करणे :
- काही लोक कामानिमित्त बाहेर असतात किंवा काही कारणास्तव शौचाला जाण्याची गरज दुर्लक्षित करतात आणि यामुळे सुद्धा बद्धकोष्ठता जाणवू शकते.
दिनचर्येमध्ये झालेला बदल :
- काही कारणास्तव प्रवास किंवा इतर कारणांमुळे दैनंदिन जीवनामध्ये दिनचर्येमध्ये जर काही बदल झाले तर अशावेळी सुद्धा पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता जाणवू शकते.
कमोडचा वापर:
- काही व्यक्तींना कमोड वापरल्यामुळे सुद्धा पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेची अडचणी येऊ शकते.
बद्धकोष्ठतेची लक्षणे
काँस्टिपेशनची लक्षणे पुढील प्रमाणे असू शकतात:
- पोटात वेदना किंवा ऐंठन
- मल कडक किंवा घट्ट असणे
- मलावर जाण्याची इच्छा असूनही सक्षम नसणे
- भूक कमी होणे
- थकवा किंवा अशक्तपणा
- आठवड्याभरामध्ये तीन पेक्षा कमी वेळा शौचाला जाणे.
- पोटामध्ये गॅस निर्माण होणे किंवा पोट फुगणे
- पोटदुखी
- पोटामध्ये अस्वस्थता जाणवणे
- पूर्णपणे शौच न होणे
- पोट व्यवस्थित साफ न होणे
बद्धकोष्ठतेवर उपाय :
कॉन्स्टिपेशन पासून आराम मिळवण्यासाठी काही उपाय आहेत:
फायबरयुक्त आहार:
- डाळ, भाज्या, फळे, आणि संपूर्ण धान्यांचा आहारामध्ये समावेश करा.
- दिवसाला 25-30 ग्रॅम फायबर घेणे आवश्यक आहे.
दररोज योग्य पाणी पिणे/ पाण्याचे प्रमाण :
- दिवसाला 8-10 ग्लास पाणी पिणे महत्त्वाचे आहे. यामुळे शरीर हायड्रेटेड राहील.
- शरीर हायड्रेटेड असल्यामुळे बद्धकोष्ठतेसोबत इतर समस्या सुद्धा नाहीशा होण्यामध्ये मदत होते.
व्यायाम:
- नियमित व्यायाम केल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत होते.
- व्यायाम केल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यामध्ये मदत होते त्यामुळे इतर रोज व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.
- दररोज चालायला जाणे, योगा करणे किंवा व्यायाम करणे यापैकीची पद्धत तुम्हाला योग्य वाटेल ती निवडू शकता.
सामान्य वेळेवर शौचालय जाणे:
- नियमित वेळेत शौचालयात जाणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे शरीराला वेळेवर शौचाला जाण्याची सवय लागेल.
तनाव व्यवस्थापन:
- ध्यान किंवा योगासने केल्यामुळे मानसिक ताण कमी होतो, ज्याचा फायदा संपूर्ण शरीराला होतोच परंतु त्यासोबतच पचनक्रियेला होतो.
औषधांचा वापर:
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधे घेऊ शकतात.
आयुर्वेदिक उपाय :
बद्धकोष्ठतेवर काही आयुर्वेदिक उपाय करू शकता परंतु ठामपणे हे उपाय योग्य आहे असे माहिती असेल तरच या उपायांचा अवलंब करावा, काही आयुर्वेदिक उपाय पुढील प्रमाणे :
- लिंबू सरबत पिणे.
- केळी खाणे.
- दही खाणे.
- हर्बल टी पिणे.
- तूप घेणे.
- बडीशेप खाणे.
बद्धकोष्ठता एक सामान्य समस्या असली तरीसुद्धा त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. आहारात योग्य बदल, शारीरिक ऍक्टिव्हिटी, आणि योग्य पाण्याचा वापर केल्यास या समस्येवर मात केली जाऊ शकते. जर समस्या कायम राहिली, तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल किंवा पोटासंबंधित इतर काही समस्या असेल तर आत्रेय आयुर्वेद व पंचकर्मक क्लिनिक, पुणे येथे संपर्क साधू शकता.