आयुर्वेद ही एक प्राचीन भारतीय उपचार प्रणाली आहे, आयुर्वेदामुळे बरेच आजार बरे करता येतात तेही कुठल्याही साईड इफेक्टस् शिवाय. त्वचेच्या विविध विकारांवर आयुर्वेदिक उपचार प्रभावी असू शकतात. त्वचेवर विविध विकार होत असतात त्यावर आयुर्वेदिक उपाय केल्याने फरक जाणवू शकतो.
त्वचा विकार म्हणजे काय?
- त्वचेला होणारे विविध प्रकारचे रोग किंवा समस्या म्हणजेच त्वचा विकार होय.
- त्वचा विकार सामान्यतः त्वचेसाठी अयोग्य असलेल्या अवस्थांमुळे, बाह्य घटकांमुळे किंवा अंतर्गत कारणांमुळे होऊ शकतात.
त्वचा विकारांचे प्रकार:
त्वचा विकारांचे काही प्रकार पुढील प्रमाणे आहेत :
- सूक्ष्मजंतूंच्या संक्रमणांमुळे (उदाहरण: फंगल, बॅक्टेरियल, व्हायरल)
- अलर्जी (उदाहरण: डर्मेटाइटिस)
- सूजनात्मक स्थिती (उदाहरण: प्सोरायसिस, एक्जिमा)
- अनुवांशिक कारणे (उदाहरण: वंशानुगत त्वचा विकार)
- हॉर्मोनल बदल (उदाहरण: अक्ने)
त्वचेच्या विकारांवर आयुर्वेदिक उपचार –
त्वचेचे विविध विकार आहेत त्यापैकी काही विकार आणि त्यावरील उपाय पुढील प्रमाणे :
अक्ने (पिंपल्स) :
चेहऱ्यावर, मान, किंवा पाठीवर पिंपल्स, लालसर पणा मुरुमे अशी लक्षणे अक्ने (पिंपल्स)ची असतात.
– अक्ने (पिंपल्स) वर उपाय:
- तुळशी: तुळशीच्या पानांचा रस पिंपल्स ने प्रभावित झालेल्या त्वचेवर लावा. यामुळे त्वचेवरील सूज कमी होईल.
- चंदन: चंदन पावडर आणि गुलाबजल यांचे मिश्रण करून पिंपल्सवर लावा.
डॅंडरफ (खरुज) :
डोक्याच्या त्वचेवर खाज येणे, पांढरे किंवा पिवळे कण निर्माण होणे, लालसरपणा जाणवणे अशी काही डँड्रफची लक्षणे आहेत.
– डॅंडरफ (खरुज) वर उपाय:
- नारळ तेल: नारळ तेलात लिंबाचा रस मिसळून डोक्यावर लावावे आणि १ तासाने केस डोक्याच्या त्वचेचा भाग व्यवस्थित रित्या धुऊन काढा.
- मेथी: मेथीच्या दाण्यांचे पाणी तयार करून डोक्यावर लावावे.
एक्जिमा :
खाज, लालसर डाग, त्वचेचा शुष्कपणा, त्वचा फाडणे यांसारखी लक्षणे एक्जिमाची जाणवतात.
– एक्जिमावर उपाय:
- तूप: तूप किंवा नारळाचे तेल एक्जिमाने प्रभावित झालेल्या भागावर लावा.
- हळद: हळद एक्जिमाने प्रभावित झालेल्या त्वचेवर लावावी.
त्वचा कोरडी पडणे ( ड्राय स्किन):
त्वचेला आर्द्रतेचा अभाव, खाज, त्वचा फाटणे यांसारखी लक्षणे त्वचा कोरडी पडण्याचे आहेत.
– ड्राय स्कीनवर उपाय:
- अलसीचे तेल: अलसीचे तेल त्वचेवर लावा यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा ओलसर राहते.
- पाण्याचे सेवन: अधिक पाण्याचे सेवन करा, जेणेकरून त्वचा आर्द्र राहील.
पिगमेंटेशन :
त्वचेवर काळसर डाग, विशेषतः चेहरा, हात, आणि मानावर काळसर डाग पडणे ही पिगमेंटेशनची लक्षणे आहेत.
– उपाय:
- लिंबाचा रस आणि मध :लिंबाचा रस आणि मधाचे मिश्रण करून चेहऱ्यावर लावू शकता.
- गुलाबजल: पिगमेंटेड त्वचेवर गुलाब जल लावावे यामुळे त्वचेचा काळसरपणा निघून जाण्यामध्ये मदत होते तसेच त्वचेला चमक येते.
आयुर्वेदामधील जीवनशैली :
पुढील काही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये उपयोगात आणल्यामुळे नक्कीच त्वचेच्या समस्या किंवा इतर शारीरिक समस्या कमी प्रमाणामध्ये जाणवू शकतात :
संतुलित आहार घ्यावा :
- प्रत्येक व्यक्तीने संतुलित आहार घ्यावा आणि त्यामध्ये फळे ,भाज्या तसेच हळद, आले यांसारख्या गोष्टींचा सुद्धा समावेश करावा.
- संतुलित आहार घेतल्यामुळे त्वचेच्या किंवा इतर समस्या सुद्धा जाणवत नाहीत किंवा कमी प्रमाणामध्ये जाणवतात.
योग आणि प्राणायाम:
- नियमित व्यायाम केल्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि त्वचा निरोगी राहते.
- योग आणि व्यायाम हे फक्त त्वचेसाठीच नाही तर संपूर्ण शरीरासाठी करणे आवश्यक आहे.
ताणतणाव व्यवस्थापन:
- ताणतणाव व्यवस्थापन करण्यासाठी म्हणजेच ताण कमी करण्यासाठी ध्यान, योगा करावा. यामुळे ताणतणाव व्यवस्थापन होते, तसेच त्वचेवर सुद्धा सकारात्मक परिणाम दिसू लागतात.
शरीरासाठी पाण्याचे प्रमाण :
दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक असते, योग्य प्रमाणामध्ये पाणी पिल्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि ज्यावेळी शरीर हायड्रेटेड असते त्यावेळी इतर शारीरिक समस्या तसेच त्वचेचे विकार जाणवण्याची शक्यता कमी प्रमाणामध्ये असते.
आयुर्वेदिक उपचार त्वचेच्या समस्यांवर निसर्गसंपन्न असे उपाय उपलब्ध करून देतात. या उपचारांचा करून आपण सुरक्षितपणे आणि नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घेऊ शकता. परंतु, कोणतेही उपाय उपयोगात आणण्यापूर्वी आपली त्वचा कशी आहे यानुसार आपल्या त्वचेला जे उपाय करत आहोत ते लागू होतील का, याची टेस्ट करून मगच त्याप्रमाणे उपाय करावेत, डॉक्टरांचा सल्ला घेणे सुद्धा महत्त्वाचे असते.त्वचेच्या विविध विकारांवर लक्ष देणे आणि त्यांना योग्य उपचार देणे महत्त्वाचे आहे. आवश्यक असल्यास, त्वचारोगतज्ञाचा सल्ला सुद्धा घेऊ शकता.
तुम्हाला जर त्वचे संबंधित काही विकार असतील त्याबद्दल मार्गदर्शन आणि उपचार हवे असतील तर आत्रेय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, हडपसर, पुणे येथे संपर्क साधू शकता.