स्तनपान – World Breastfeeding Week – 1st Aug to 8th Aug

स्तनपान

  • जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची सर्वप्रथम मूलभूत गरज म्हणजे आईचे दूध.
  • नऊ महिने आईच्या पोटात वाढलेलं ते इवलेसे बाळ आईच्या प्रत्येक श्वासाशी आधीच नाळेमार्फत जोडले गेलेले असते.
  • जन्मानंतर प्रथम सहा महिन्यांपर्यंत बाळाला पूर्णपणे आईच्या दुधातून पोषण मिळते.
  • आयुर्वेद शास्त्रानुसार या दुधाला “स्तन्य”असे म्हणतात

व दूध पाजण्याच्या क्रियेला स्तनपान असे संबोधण्यात आले आहे.

  • बाळ जन्माला आल्यानंतर प्रथम दोन तासातच दूध पाजणे अत्यंत महत्त्वाचे असते.
  • त्यामुळे बाळाची भूक भागते व आईलाही पुढे दूध भरपूर येण्यास मदत होते

या काळात बाळाला मध पाणी इ, गोष्टी देऊ नयेत

  • आईचे पाहिले येणारे दूध जरी घट्ट असले तरी त्याने बाळाचे पोटही भरते व ते बाळाला व्यवस्थित पचते सुध्दा.
  • परंतु जर काही कारणांमुळे मातेला दूध पाजता येत नसेल तर डॉक्टरांशी जरूर संपर्क करावा.
  • साधारण 3 ऱ्या दिवसापासून आईला व्यवस्थित दूध येते,
  • आईला दूध व्यवस्थित यावे याकरिता आईचा आहार व झोप व्यवस्थित असणे हे अत्यंत महत्त्वाचे असते
  • पचायला हलका परंतु पौष्टिक असा आहार मातेने घ्यावा
  • स्तन्य निर्मिती ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे
  • ती नीट व्हावी म्हणून मातेने आहाराबरोबर स्वतःच्या झोपेकडे पूर्ण लक्ष देणे गरजेचे असते तसेच तिने या काळात
  • फक्त बाळाचाच विचार करणे गरजेचे आहे,
  • ताणतणावामुळे दूध कमी होऊ शकते,

स्तन्य पुरेसे तयार व्हावे याकरिता खालील गोष्टी कराव्या

  1. मातेचा आहार परिपूर्ण व पौष्टिक असावा.
  2. मातेने पूर्ण आराम घ्यावा.
  3. दूधभात, खसखस डिंक अळीव लाडू, चिकनचे अळणी पाणी इ.नी दूध वाढते
  4. दूध कमी पडत असल्यास ताबडतोब तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,