स्तनपान
- जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची सर्वप्रथम मूलभूत गरज म्हणजे आईचे दूध.
- नऊ महिने आईच्या पोटात वाढलेलं ते इवलेसे बाळ आईच्या प्रत्येक श्वासाशी आधीच नाळेमार्फत जोडले गेलेले असते.
- जन्मानंतर प्रथम सहा महिन्यांपर्यंत बाळाला पूर्णपणे आईच्या दुधातून पोषण मिळते.
- आयुर्वेद शास्त्रानुसार या दुधाला “स्तन्य”असे म्हणतात
व दूध पाजण्याच्या क्रियेला स्तनपान असे संबोधण्यात आले आहे.
- बाळ जन्माला आल्यानंतर प्रथम दोन तासातच दूध पाजणे अत्यंत महत्त्वाचे असते.
- त्यामुळे बाळाची भूक भागते व आईलाही पुढे दूध भरपूर येण्यास मदत होते
या काळात बाळाला मध पाणी इ, गोष्टी देऊ नयेत
- आईचे पाहिले येणारे दूध जरी घट्ट असले तरी त्याने बाळाचे पोटही भरते व ते बाळाला व्यवस्थित पचते सुध्दा.
- परंतु जर काही कारणांमुळे मातेला दूध पाजता येत नसेल तर डॉक्टरांशी जरूर संपर्क करावा.
- साधारण 3 ऱ्या दिवसापासून आईला व्यवस्थित दूध येते,
- आईला दूध व्यवस्थित यावे याकरिता आईचा आहार व झोप व्यवस्थित असणे हे अत्यंत महत्त्वाचे असते
- पचायला हलका परंतु पौष्टिक असा आहार मातेने घ्यावा
- स्तन्य निर्मिती ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे
- ती नीट व्हावी म्हणून मातेने आहाराबरोबर स्वतःच्या झोपेकडे पूर्ण लक्ष देणे गरजेचे असते तसेच तिने या काळात
- फक्त बाळाचाच विचार करणे गरजेचे आहे,
- ताणतणावामुळे दूध कमी होऊ शकते,
स्तन्य पुरेसे तयार व्हावे याकरिता खालील गोष्टी कराव्या
- मातेचा आहार परिपूर्ण व पौष्टिक असावा.
- मातेने पूर्ण आराम घ्यावा.
- दूधभात, खसखस डिंक अळीव लाडू, चिकनचे अळणी पाणी इ.नी दूध वाढते
- दूध कमी पडत असल्यास ताबडतोब तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,